शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आवारामधील कौशल्य विकास केंद्र रत्नागिरी येथे श्रावण महिन्याचा अवचित्य साधून आयोजित केली गेली “श्रावण क्रेविंग्स “ पाककला स्पर्धा.

या पाककला स्पर्धेमध्ये सेंटर च्या कॉमिज शेफ या बॅच च्या विद्यार्थ्यांनी शेफ ऋत्वेज शिरधनकार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी श्रावणातील खाद्यपदार्थ या थीम ला अनुसरून खूप नाविन्य पूर्ण अश्या उत्तम रेसिपी सादर केली होत्या जसे की- टाकळ्याचे मंचुरियन, व्हेज फिश फ्राई, व्हेज ऑम्लेट, नीर फणसाचे कबाब, व्हेज लॉलीपॉप, रागी मोदक, स्वीट पोटैटो गुलाबजाम, टेंडर कोकोनट पाइनएप्पल आईस्क्रीम इत्यादी विविध क्रिएविंग्स, चविष्ट आणि खूप विलक्षण अश्या रिसीपीज होत्या.

या स्पर्धे ला खरी कसोटी तर परीक्षकांची लागली होती. या स्पर्धेला परीक्षक म्हणून रत्नागिरी मधील खाद्य संस्कृती व हॉटेल व्यवसायातील प्रसिद्ध नाव “हॉटेल खादाडी कट्टा” चे मालक श्री उदय गोखले तसेच प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ सिद्धली लाकडे या लाभल्या होत्या.

स्पर्धेच्या समारोप प्रसंगी परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व या आधी असे श्रावण स्पेशल खाद्यपदार्थ या आधी कधीही बघितले नव्हते असे विलक्षण खाद्यपदार्थ सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व कौशल्य विकास केंद्र यांचे आभार व्यक्त केले.

ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी कौशल्य विकास केंद्राचे सेंटर हेड श्री निखिल शुक्ला सर, शेफ ऋत्वेज शिधनकर , श्री अमेय मुळ्ये , श्री अमित धाटावकर, सौ अमृता साळवी ,श्री तुषार सुवारे, श्री अक्षय मोरे, सूर्यकांत ढवळे यांचे विशेष सहकार्य लाभले.