भजने,चित्ररथ व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…!
आज एक ऑगस्ट रोजी रात्रौ 9 वा. पटवर्धन चौक येथे बकासुराचा वध हा देखावा…!
कणकवली शहरातून गुरुवार 7 ऑगस्टला नगर प्रदक्षिणेने होणार सांगता…!
कणकवली – श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला गुरवारी दुपारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.सप्ताह सुरवातीस घटस्थापना करून. ब्रम्हवृदाच्या हस्ते विधिवत पूजा, गाऱ्हाणे करून ‘जय जय विठोबा रखुमाई’ च्या विठ्ठल नामाच्या अभंगांनी,टाळघोषात भाविकांनी रिंगण करत जयघोष केला . या सप्ताह निमित्त मंदिर परिसर विविध फुलांच्या सहाय्याने सजवण्यात आले आहे.या मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून काशीविश्वेश्वर देवस्थानच्या वतीने सप्ताहाचे नीटनेटके नियोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी विविध पारांचे प्रमुख ,मानकरी तसेच भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या दिवशी तेलीआळी मित्र मंडळ यांनी देखावा काढत हा दिवस जागवला तर दुसरा दिवस शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी महापुरुष मित्र मंडळ बाजारपेठ यांचा असून ‘बकासुराचा वध’ हा देखावा रात्रौ 9 वा. पटवर्धन चौकात पाहावयास मिळणार आहे. यानंतरचे हरिनाम सप्ताहाचे दिन वितरण पुढील प्रमाणे,
शनिवार 2 ऑगस्ट पटकीदेवी मित्रमंडळ, रविवार 3 ऑगस्ट ढालकाठी मित्रमंडळ, सोमवार 4 ऑगस्ट जुना मोटर स्टॅण्ड मारुतीआळी मित्रमंडळ, मंगळवार 5 ऑगस्ट बिजलीनगर मित्रमंडळ, बुधवार 6 ऑगस्ट आंबेआळी मित्रमंडळ असे असून
पढील 6 दिवसाच्या कालावधीत मंदिरात रात्री चित्ररथ दिंडी व भरगच्च भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. यामुळे शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.
गुरुवार दि. 7 ऑगस्ट रोजी प्रदक्षिणा व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या हरिनाम सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष, श्री देव काशीविश्वेश्वर देवस्थान कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.












