दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई
रत्नागिरी : प्रतिनिधी
दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने बुधवारी (३० जुलै) रात्री भाट्ये परिसरातील कोहिनूर हॉटेलजवळून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून १७ ग्रॅम गांजा आणि एक टोयोटा फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली आहे. या सर्व मालाची किंमत ५ लाख ३ हजार ४९५ रुपये आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे: अमान नौशाद शेकासन (२६), राज नितीन राउत (२५), कैफ नियाज होडेकर (२१), दानिश मेहबूब मुल्ला (२२) आणि मुसद्दीक मुबीन म्हसकर (२२). हे सर्व रत्नागिरीचे रहिवासी आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये दहशतवाद विरोधी शाखेचे उपनिरीक्षक समीर मोरे, सहायक पोलीस फौजदार सुशील कदम आणि इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.










