देवरूख (प्रतिनिधी) :
दि. 11 व दि 12 सप्टेंबर 2025 या दोन दिवशी न्यू इंग्लिश स्कुल देवरुख प्रशालेमध्ये रत्नागिरी संस्कृत शिक्षक मंडळ व जि. प. रत्नागिरी यांच्या संयुक्त माध्यमातून संस्कृत दिन संपन्न झाला. या संस्कृत दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला संस्था सदस्य श्री सुरेंद्र गीते उपस्थित होते.
दि. 11 सप्टेंबर रोजी संस्कृत शिक्षकांसाठी उद्धबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला श्री रघुवीर रामदासी सर (सांगली) यांनी पहिले पुष्प गुंफले यात सरांनी स्पर्धा परीक्षा व संस्कृत भाषा तसेच आजचे संस्कृतचे सामाजिक स्थान या विषयावर मार्गदर्शन केले तर दुसरे पुष्प गुंफले ते चिपळूण डी. बी. जे महाविद्यालयाच्या सौ जोशी मॅडम यांनी,यामध्ये जोशी मॅडम नी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व संस्कृत विषय यावर मार्गदर्शन केले.त्यानंतर त्याच दिवशी सर्वसाधारण सभेने दिवस संपन्न झाला. दुसऱ्या दिवसाची दि.12 सप्टेंबर ची सुरवात ग्रंथ दिंडीने झाली यामध्ये देवरुख हायस्कूल च्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. नयनरम्य अश्या ग्रंथदिंडीने दिवसाची सुरवात झाली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची रंगत अजून वाढली. देवरुख हायस्कूल,सोनवडे हायस्कूल व ठाकरे हायस्कूल चे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमामध्ये निवृत्त शिक्षक सन्मान सोहळा तसेच वैदिक साहित्याचा प्रचार प्रसार करणारे देवरुख पाठशाळेचे श्री आचार्य गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद भागवत सर तसेच उपाध्यक्षा सौ नेहा जोशी मॅडम उपस्थित होत्या.
संघटनेच्या अध्यक्षा सौ सरदेसाई मॅडम यांनी आपल्या भाषणात कार्यक्रम आयोजकांचे कौतुक केले तसेच श्रीसदानंद भागवत सर यांनी संस्कृत विषय प्रचार व प्रसारासाठी आम्ही जे शक्य होईल ते योगदान देऊ असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात शाळा समिती अध्यक्ष सौ नेहाताई जोशी मॅडम यांनी संघटनेचे कौतुक केले व माझ्याकडून देखील या कार्यासाठी आवश्यक ते योगदान दिले जाईल असे सांगितले. संपूर्ण वंदे मातरम् च्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर स्नेह भोजनाने साधारण दुपारी 2. 30 वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. संस्था अध्यक्ष श्री भागवत सर, शाळा समिती चेअरमन सौ जोशी मॅडम, प्रशालेचे मुख्या. श्री कोकणी सर, पर्य. श्री मोघे सर यांच्या मार्गदर्शना खाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने हा कार्यक्रम संपन्न करण्यात मोलाचे सहकार्य केले.













