रत्नागिरीच्या प्रभाग क्रमांक 14 मधे भाजपकडून वह्या वाटप

रत्नागिरी :

प्रभाग क्रमांक 14 तेली आळी रत्नागिरी शहर मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वह्या वाटपाचे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून आज गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाले. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांच्या मुलांचाही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग होता ज्यामुळे सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांना मोठी स्वप्नं बाळगा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिश्रम घ्या असे मोलाचे मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष दादा ढेकणे, प्रमुख पाहुणे उदय बसणकर, विक्रम जैन, अमित विलणकर, सत्यवती बोरकर, वैभवी शिवलकर, अज्जू हूनेरकर आणि समीर वस्ता छगन छिपा यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.