गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथी निमित्त वकील संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन

रत्नागिरी : 

गुरुवारी रत्नागिरी जिल्हा न्यायालय आवारात गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रसिद्ध स्मृतीशिल्प स्थानी रत्नागिरी वकील संघातर्फे पुष्पांजली अर्पण करण्यात आली

साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते, दोन देशांच्या राष्ट्रगीतांसह असंख्य प्रेरणादायी साहित्य कृतींचे निर्माते, सुप्रसिद्ध चित्रकार, शिक्षण तज्ञ व्यासंगी विद्वान अशी गुरुदेव रविंद्रनाथ यांची ओळख सदैव प्रेरणादायी राहील असे विचार त्याप्रसंगी व्यक्त करण्यात आले. यावेळी रत्नागिरी वकील संघटनेच्या उपाध्यक्ष सौ शाल्मली आंबुलकर, खजिनदार श्री अवधूत सोनू कळंबटे माजी खजिनदार श्री तुषार भाटकर अधिवक्ता परिषदेचे जिल्हा कार्यकारी सदस्य श्री निलेश घैसास, अधिवक्ता परिषदेचे रत्नागिरी जिल्हा शाखेचे संस्थापक आणि माजी सचिव श्री सचिन रेमणे अधिवक्ता श्री अनुराग पंडित, अधिवक्ता श्री बाणे इत्यादी उपस्थित होते