जामसंडे सोहनीवाडी येथील संतोष कदम यांचा मृतदेह विहीरीत आढळला

देवगड l प्रतिनिधी :शुक्रवारी घरातून सकाळी मोलमजुरी कामासाठी गेलेल्या जामसंंडे सोहनीवाडी येथील संतोष मोहन कदम (४२) हे मृतवास्थेत तेथिलच एका शेतविहीरीच्या पाण्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे.त्यांचा मृतदेह मुलालाच शनिवारी सायंकाळी ६.३० वा.सुमारास तरंगताना दिसला.

 

जामसंडे सोहनीवाडी येथील संतोष मोहन कदम हे मोलमजुरीचे काम करीत होते.शुक्रवारी सकाळी ते ८ वाजता घरातून बाहेर पडून गेले.ते घरी आले नाही म्हणून त्यांची घरातील लोकांनी शोधाशोध केली.शोधाशोध सुरू असताना त्यांचा मुलगा दयानंद याला शनिवारी सायंकाळी ६.३०.वा.सुमारास सोहनीवाडी येथील स्वप्नील भोवर यांच्या शेतविहीरीमध्ये वडीलांचा मृतदेह तरंगताना दिसला.त्यांनी याबाबत वाडीतील ग्रामस्थांना सांगीतल्यानंतर देवगड पोलिस स्टेशनला कळविण्यात आले.अ‍ेएस्आय अनिलकुमार पवार, पोलिस हवालदार आशिष कदम, विश्वास पाटील, होमगार्ड जोईल यांनी घटनास्थळी जावून ग्रामस्थांच्या सहाय्याने विहीरीतील मृतदेह बाहेर काढला.या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला असून घटनेची नोंद व पुढील प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.कदम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुली असा परिवार असून ते मोलमजुरीचे काम करीत होते तर त्यांचा मुलगा आयटीआयमध्ये शिकत असून मुलगीही शिक्षण घेत आहे.