रत्नागिरी: भाजप दक्षिण रत्नागिरी तालुक्यातर्फे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने झरेवाडी गावात दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विशेष प्रावीण्य आणि शिष्यवृत्ती मिळवलेल्या ५२ विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपचे दक्षिण रत्नागिरी तालुकाध्यक्ष दादा दळी, उपाध्यक्षा सौ. नेहा कळंबटे, तसेच गुरुदास गोविलकर, राजा सांडीम, पवार, अवधूत कळंबटे, बूथ अध्यक्ष प्रवीण कळंबटे आणि जयवंत कळंबटे उपस्थित होते.
याव्यतिरिक्त, गावातील पोलिस पाटील बाळकृष्ण गोताड, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल गोताड, मानकरी अनंत गोताड, वसंत कळंबटे, मोहन कळंबटे, तसेच अन्य ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी दादा दळी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत कळंबटे यांनी केले. विशाल कळंबटे, करण कळंबटे, सुजल गोताड, अंकित कळंबटे आणि प्रसाद कळंबटे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.













