दलवाई हायस्कूलच्या प्राथमिक विभागामध्ये भरला रानभाज्यांचा मेळा

चिपळूण (वार्ताहर) : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल मिरजोळी प्राथमिक विभागामध्ये आदिवासी दिनाचे औचित्य साधून नुकतेच रानभाज्या प्रदर्शन व पाककृतीस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निमित्त आयोजित स्पर्धेत, सध्या लोप पावत चाललेलया रानभाज्या आणि त्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा मेळाच भरला होता. यामुळे अनेकांना विविध भाज्यांची चव चाखता आली.

या स्पर्धेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये इयत्ता इ.१ली ते ४थी च्या १२ पालकांनी सहभाग नोंदविला. पालकांनी आपल्या कल्पनेतून विविध रानभाज्यांपासून कटलेट, पकोडे, थालिपीठ, भाजी भाकरी, भाजी, वडी यांसारखे रुचकर पदार्थ बनविले होते. या कार्यक्रमांचे उदघाटन संस्थेचे पदाधिकारी मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. दलवाई हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात माध्यमिक विभागातील इ.१०वी च्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्यप्रकाराने केली. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयातील शिक्षक श्री मोहन पवार यांनी केले. तसेच यादिवशी क्रांतिदिन असल्याने इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. आपले मनोगत व्यक्त करताना स्कुल कमिटी चेअरमन खालीद दलवाई यांनी रानभाज्या या आपल्या आरोग्यासाठी खजिनाच आहेत व त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे, असे म्हटले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून डांगे मॅडम आणि बोराटे मॅडम लाभल्या होत्या. या स्पर्धेत चव, पौष्टिकता, सादरीकरण आणि वेगळेपण या मुददयांच्या आधारे परिक्षण करुन प्रथम 3 क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक – सौ. ऋतुजा रुपेश सागवेकर (पदार्थ – कुर्डुचे थालिपीठ) व्दितीय क्रमांक. सौ. काव्या किरण आंब्रे (पदार्थ – भारंगीची भाजी आणि भाकरी) तृतीय क्रमांक- – सौ. रिया राजेंद्र बने (पदार्थ- कंटोलीचे हरभरा कबाब) पाहुण्यांच्या हस्ते प्रथम तीन क्रमांकांना प्रमाणपत्र व बक्षीस आणि इतर सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन खालीद दलवाई, संस्था सचिव जहिर दलवाई, संस्था सहसचिव व प्राथमिक विभाग शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव, सदस्य मंगेश चव्हाण, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रोहित जाधव, डांगे मॅडम, बोराटे मॅडम, प्राथमिक विभाग शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. रिया बने आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मयुरी तटकरे यांनी केले. तसेच सुत्रसंचालन सहा. शिक्षिका प्रेरणा मोहिते यांनी केले असून आभार सहा. शिक्षिका नेहा मेस्त्री यांनी मानले. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक विभागातील शिक्षक दिक्षा तिरमारे, साहिल तांबे, धनश्री कातारे, पल्लवी हिरे व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.