दापोली प्रतिनिधी:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना रत्नागिरी तसेच तालुका क्रीडा अधिकारी, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली मधील ए.जी. हायस्कूल येथील माधव कोकणे सभागृह येथे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये ए.जी. हायस्कूल दापोलीच्या विद्यार्थ्यांनी नेतृत्व कामगिरी केली.
या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगट मुलांमध्ये कु. वेदांत भागवत चौथा क्रमांक आणि 14 वर्षे वयोगट मुलींमध्ये कु. ग्रीष्मा चव्हाण प्रथम क्रमांक संपादन केला.
17 वर्षे वयोगट मुलांमध्ये सार्थक पाटील पाचवा क्रमांक आणि 17 वर्षे वयोगट मुलींमध्ये कु.रिद्धीमा चव्हाण प्रथम क्रमांक, कु.श्रीया दाभोळे द्वितीय क्रमांक, कु. अपेक्षा तांडेल चौथा क्रमांक संपादन केला.
19 वर्षे वयोगट मुलांमध्ये विनय राऊत प्रथम क्रमांक, पारस राजवाडकर चौथा क्रमांक,वेदांत साठे पाचवा क्रमांक आणि 19 वर्षे वयोगट मुलींमध्ये कु. अनन्या चव्हाण व्दितीय क्रमांक, कु.गौरी पिसे तृतीय क्रमांक, कु. सिमरन पटवा चौथा क्रमांक, कु.स्वरा कोटिया पाचवा क्रमांक संपादन केला.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची रत्नागिरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
या चमकदार कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन डॉ.प्रसाद करमरकर, व्हा. चेअरमन श्री.दिनेश नायक, विश्वस्त श्री.समीर गांधी, सेक्रेटरी डॉ.विनोद जोशी, ए.जी.हायस्कूल शालेय समिती चेअरमन श्री.रविंद्र कालेकर, संचालिका सौ.स्मिता सुर्वे आणि सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री शरद कांबळे सर, उपमुख्याध्यापक श्री अर्जुन घुले सर, पर्यवेक्षक श्री पेटकर सर व श्री मगदूम सर, क्रीडा शिक्षक श्री प्रदिप शिगवण सर, श्री अमित वाखंडे सर, श्री.प्रथमेश दाभोळे सर,बुद्धिबळ स्पर्धा प्रमुख प्रशांत मोहिते सर , अनिरुद्ध रिसबूड सर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.











