पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा   ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांसह जलसंधारणासाठी पुढाकार

उंबराचे पाणी येथे बांधला श्रमदानातून वनराई बंधारा…वेंगुर्ले : प्रतिनिधी

एस. एल. देसाई विद्यालय, पाट येथील विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत कोचरा आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी उंबराचे पाणी, कोचरा येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविण्यासह जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात जिल्हा परिषद सदस्य सौ. यज्ञा साळगावकर, एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा शिवसेना विभागप्रमुख दत्ता साळगावकर, कोचरा उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल वेंगुर्लेकर, ग्रामस्थ काका हंजनकर व श्री. परब, ग्रामविकास अधिकारी श्री. राऊळ, श्री. झाड व श्री. अक्षय राऊळ यांचा सहभाग होता.

तसेच पाट हायस्कूलचे शिक्षक श्री. सुधीर देसाई, श्री. प्रदीप पाटकर यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष श्रमदान करून वनराई बंधारा उभारण्यात योगदान दिले.

जलसंधारणाच्या दृष्टीने गावातील पाणी अडविणे, जमिनीत पाण्याची पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.