मुंबई:
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम-मध्य आणि त्याला लागून असलेल्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनार्याजवळ कायम आहे. पुढील २४ तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत ते उत्तर किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा ओलांडण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यासाठी
१३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान मराठवाडा विभागामध्ये विखुरलेल्या ते जोरदार सरींसह काही ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (४०-५० किमी प्रतितास) वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मासेमार बांधवांसाठी सूचना:
उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १३ ते १६ ऑगस्टपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास, ६० किमी प्रतितास पर्यंत) जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मासेमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.













