घर-घर तिरंगा अभियान – FES इंग्लिश मिडीयम स्कूल फुरूस

खेड । प्रतिनिधी   FES इंग्लिश मिडीयम स्कूल फुरूस च्या विद्यार्थ्यांनी आज उत्साहाने घर-घर तिरंगा अभियान राबवून देशभक्तीची जाणीव जागवली.
या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी गावातील विविध भागात, शाळेजवळील परिसरात तसेच घराघरांत जाऊन नागरिकांना तिरंग्याचे महत्त्व पटवून दिले आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी प्रत्येक फुरूस गावातील सर्व व्यवसाय वर्गांना फुलांचे बुके देऊन तसेच वयोवृद्धांशी आणि घराघरातील लोकांशी संवाद साधून *“हर घर तिरंगा – अभिमानाचा झेंडा”* हा संदेश दिला.

शिस्तबद्ध रॅली, देशभक्तीच्या घोषणा आणि हसऱ्या चेहऱ्यांनी भरलेले हे अभियान पाहून ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. या मोहिमेमुळे समाजात देशभक्तीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.

तसेच FES शाळेमध्ये *तिरंगा फूड फेस्टिवल* आयोजित करण्यात आला होता. शाळेचे अध्यक्ष श्री. फहीम अमीन परकार यांनी हया कार्यक्रमाचे आयोजन केले होते व त्यांच्या अध्यक्ष खाली हा तिरंगा फूड फेस्टिवल चागल्यारिती पार पडला. अध्यक्ष श्री. फहीम अमीन परकार यांनी शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे , शिक्षकांचे तसेच सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.