पाटपन्हाळे महाविद्यालयाचे प्रा. सुधीर वासनिक सेट परीक्षेत उत्तीर्ण

पाटपन्हाळे (वार्ताहर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा २६ मार्च २०२३ ला झालेली होती. त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून श्री प्रा. एस पी वासनिक हे या परीक्षेत इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले. सध्या ते न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात. महाविद्यालयाच्यावतीने अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एम्. ए. थरकार सर यांनी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्यात. वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन केले जात आहे.