रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील उद्यमनगर येथील 10वीतील मुलाने परिक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 23 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा.सुमारास घडली.
रेहान असलम कापडे (15,रा.स्वामी समर्थ अपार्टमेंट बाष्टे कपाउंड उद्यमनगर,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचा मामा अश्रफ अली ईसाक पागारकर (65,रा.एमजी रोड भाजी मार्केट,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, त्यांची बहिण नसरीन आसलम कापडे यांचा मुलगा रेहान हा 10वीत शिकत होता. त्याला परिक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली होती. त्यामुळे शनिवारी रात्री रेहानने रुममधील पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी रेहानला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्यानी रेहानला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे











