सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये देवगड महाविद्यालयाचे घवघवीत यश

देवगड / प्रतिनिधी :विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, यासाठी मुंबई विद्यापीठ दरवर्षी सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करते. मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव २०२५-२६ ची विभागीय फेरी संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३१ महाविद्यालयातील सुमारे ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला होता. यात देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकूण २१ कला प्रकारात सहभाग नोंदवून ११ प्रकारात घवघवीत यश संपादन केले.

 

या सांस्कृतिक युवा महोत्सवात देवगड महाविद्यालयाने एकांकिका (मराठी) प्रथम क्रमांक, भारतीय समूहगीत गायन प्रथम क्रमांक, भारतीय लोकनृत्य प्रथम क्रमांक, कथाकथन (मराठी) द्वितीय क्रमांक, एकपात्री अभिनय (हिंदी) द्वितीय क्रमांक, स्किट (मराठी) द्वितीय क्रमांक, एकांकिका (हिंदी) द्वितीय क्रमांक, मेहंदी डिझाइन तृतीय क्रमांक, एकपात्री अभिनय (मराठी) तृतीय क्रमांक, वादविवाद स्पर्धा (मराठी) उत्तेजनार्थ, हिंदी स्किट उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे देवगड शिक्षण विकास मंडळ संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.