पडवे तंटामुक्ती अध्यक्षपदी विलास गडदे

आबलोली (वार्ताहर)
तालुक्यातील पडवे येथील निर्मल ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच मुजीब जांभारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून विलास गडदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी या सभेला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खातू, शमा मखजनकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गडदे, पोलिस पाटील अनंत गांधी, सुमेध सुर्वे, अमानत जांभारकर, विनायक भोसले, पराग कोळवणकर, सचिव नईम मखजनकर, ओंकार गडदे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.