आता सर्व तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कार्यान्वित होणार

जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना आदेश

साईप्रसाद कल्याणकर यांच्या प्रयत्नांना यश

बांदा l प्रतिनिधी :बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. तसे निर्देश प्रांताधिकारी व सर्व तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी निर्गमित केले आहे आहेत.

 

प्रशासकीय कामात गतिमानता आणून प्रभावीपणे कामकाज करण्यासाठी सर्व तहसीलदार कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी साईप्रसाद कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर मागणी मान्य करून प्रांताधिकारी व सर्व तहसीलदारांना कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.