वैभववाडी l प्रतिनिधी : मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यातील घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे त्यांनी याही वर्षी घरोघरी जात गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले. तालुक्यातील तिथवली, वेंगसर, मांगवली, भुईबावडा, उंबर्डे व वैभववाडी येथील घरगुती गणपतीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर वैभववाडी शहरातील गणेश नगर मंडळ, गोपाळ नगर मंडळ व तांबेवाडी मंडळाने प्रतिष्ठापणा केलेल्या सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेतले.

यावेळी मंडळाच्या वतीने पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, नेहा माईणकर, संजय सावंत, प्राची तावडे व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












