तिलारीत भीषण अपघात : मोटारसायकल व महिंद्रा पिकअपची टक्कर ; युवक जागीच ठार

तिलारीत भीषण अपघात : मोटारसायकल व महिंद्रा पिकअपची टक्कर ; कुब्रल येथील

युवक राहुल वरक जागीच ठार

तर विठ्ठल घारे जखमी

मित्रा समवेत पार्टी करणे भोवले!

दोघे तिलारीत गेले होते फिरायला

दोडामार्ग | प्रतिनिधी : तिलारी येथे शेटवेवाडी नजीक मुख्य रस्त्यावर आज दुपारी भीषण अपघात झाला. महिंद्रा पिकअप व मोटारसायकलमध्ये झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, MH 07 AF 0228 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून युवक दोडामार्ग कडे जात होते तर बेळगाव कडे जाणारी समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनाशी जबर धडक झाली. या धडकेत युवकाच्या डोक्याचा चेंदा मेदा झाला आणि कु. राहुल दिलीप वरक वय 20वर्षे रा. कुब्रल मोयची वाडी येथील ह्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.तर सोबत असलेला युवक विठ्ठल घारे वय 19वर्षे हा जखमी झाला त्याला दोडामार्ग रुग्णालय येथे दाखल केले असून उपचार सुरु आहे त्याला अधिक उपचारा साठी गोव्यात हलविण्यात आले आहे मात्र युवक रुग्णालय दाखल केले असता मृत जाहीर करण्यात आले आहे अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहे