चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नव्या आवर्त ठेव खाती योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रावण महिन्यातील ठेव वृद्धी मास योजनेतही लक्षणीय ठेव वाढ

चिपळूण (प्रतिनिधी) : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या ७ सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त पतसंस्थेने विशेष उद्दिष्ट ठेवून वाढदिवसापूर्वी जाहीर केलेल्या मासिक ठेव योजनेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
रक्कम रुपये १०० रुपयांपासून किती ही रकमेचे खाते आपण या योजने अंतर्गत उघडून सहभागी होता येत आहे. सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण नागरी पतसंस्थेने दिनांक १ सप्टेंबर ते दिनांक ७ सप्टेंबर २०२५ या कालावधी करता विशेष उद्दिष्ट ठेवून नवीन खाती सुरू करणे योजना राबविण्यात आली होती. या अंतर्गत १ ते ७ सप्टेंबर दरम्यान १६८३ नवीन मासिक खाती सुरू करण्यात आली असून या योजनेतून प्रत्येक महिन्याला २४ लाख ७० रुपये जमा होणार आहेत व एप्रिल २०२५ पासून आज पर्यंत नव्या खातेदारांमध्ये १६ हजार ६३ नवी खाती सुरू करण्यात आली असून यातून २ कोटी ४८ लाख रुपये रक्कम दरमहा जमा होणार आहेत. श्रावणमास निमित्त सुरू करण्यात आलेल्या ठेव वृद्धी मास योजनेत पतसंस्थेच्या मासिक ठेव योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून श्रावणमास, धनलक्ष्मी, संकल्प ठेव, श्री गणेश ठेव,उत्कर्ष ठेव, धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव,सिद्धी ठेव व धनसंचय ठेव या योजनांमधून सुमारे ७ हजार ५०० मासिक ठेव खाती ग्राहकांनी नव्याने सुरू केली आहेत. तसेच पतसंस्थेच्या मुदत ठेव योजनेंतर्गत योजनेमध्ये बारा कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या मासिक ठेव खात्यामधून दरमहा साडेसहा कोटी रुपयांची वाढ होत आहे.
चिपळूण नागरी पतसंस्थेने सभासदांना बचतीची सवय लागावी, यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गेल्या ३२ वर्षांच्या कालखंडात धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव, राष्ट्र अमृतमहोत्सव ठेव, संकल्प ठेव, श्रावण मास ठेव,समृद्धी ठेव, गणेश ठेव, उत्कर्ष व धनसंचय ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धिनी, दामदुप्पट, दामतिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे धनलक्ष्मी ठेव योजनेंतर्गत ४६ हजार ४६६ खातेदार तर उर्वरित मासिक ठेव योजनेत ४६ हजार १६८असे एकूण ९२ हजार ३६४ खातेदारांच्या योजनेमध्ये दर महिना ६ कोटी २० लाख रुपये संकलित होत आहेत.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाखांचे जाळे रोवलेल्या राज्यातील प्रसिद्ध चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने” ‘आपली माणसे ! आपली संस्था’ या ब्रिदवाक्याने नेहमीच ग्राहकांचे हित जोपासले आहे. पतसंस्थेमध्ये ग्राहकांच्या फायद्याच्या अनेक योजना व कर्ज योजना राबवून सर्वसामान्य ग्राहकांपासून सर्वच स्तरातील ग्राहकांना परिपूर्ण लाभ मिळवून देण्याचे आजपर्यंत प्रयत्न केले आहेत. यात महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा सहभाग आहे. आपल्या उज्वल भविष्याची तरतूद करावी आणि संस्थेच्या सर्व ठेव योजना तसेच आरडी ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या पतसंस्थेच्या शाखेत भेट द्यावी, असे आवाहन पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी केले आहे.