समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपकडून सिया जोशी हिला शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा

चिपळूण :– रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी डोंगर दरी भागात वास्तव्यास असलेल्या आकलेच्या माजी सरपंच श्रीमती. जयश्री गणपती जोशी यांची नात व अमित गणपत जोशी व शलाका अमित जोशी (मु.पो.आकले धामणखोरी ता.चिपळूण जि. रत्नागिरी) यांची सुकन्या सिया अमित जोशी.हिची रशिया येथे MBBS शिक्षणासाठी निवड झाली आहे. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच मोहिते यांचे मित्र, देशाचे सैनिक राजेश कोकरे यांची २४ वर्षांनी भेट झाली त्यांनाही खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
उल्लेखनीय बाब अशी की उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारी जोशी कुटुंबातील व आकले गावातील प्रथम कन्या आहे.याचा समाजसेवक विनेश भाऊ मोहिते.यांना खूप आनंद होत आहे, याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुप तर्फे रियाला खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या….या यश्याबद्दल मन.पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी देण्यासाठी उपस्थित राहुल कदम, विवेक जाधव, राजेश जाधव, विद्यमान सैनिक राजेश कोकरे. दीपाली मोहिते, रेशमा कदम, आदी उपस्थित होते.