कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर यांचा १२ डिसेंबर रोजी जयंती कार्यक्रम

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी :

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव तर्फे स्व. प्रा. उदय रमाकांत खानोलकर यांचा जयंती कार्यक्रम सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता वाचन मंदिराच्या रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक मा. श्री संजय पुनाळेकर (उपाध्यक्ष “कलावलय” वेंगुर्ला व निवृत्त अधिकारी भारतीय स्टेट बँक ) तसेच मा. डॉ. आनंद बांदेकर (राज्यशास्त्र विभाग प्रमुख बॅ. बाळासाहेब खर्डेकर महावि द्यालय वेंगुर्ला) हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शेखर मधुकर पाडगावकर (सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी, महाराष्ट्र शासन) हे भूषविणार आहेत. तरी

सदर कार्यक्रमास कै. उदय खानोलकर प्रेमी, ग्रंथ प्रेमी, ग्रंथालयीन वाचक हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Sindhudurg