नवरात्रीत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा उपक्रम : गरजू मुलींना नवीन ड्रेसचे वाटप

खेड (प्रतिनिधी) : नवरात्रीचा उत्सव सर्व समाजघटकांनी उत्साहात साजरा करावा या हेतूने लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गरजू कुटुंबातील मुलींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम दस्तुरी आदिवासी वाडी येथे पार पडला. प्रियांका कलेक्शनचे मालक लायन प्रवीण प्रजापती यांच्या सहकार्याने या वाडीतील दोन मुली – सुरेखा रामा निकम व सविता गणेश पवार – यांना नवीन ड्रेस देण्यात आले. या उपक्रमामुळे वाडीतील मुलींनाही नवरात्रीचा आनंद साजरा करण्याची संधी मिळाली.
याप्रसंगी लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर प्रमुख व माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे, लायन प्रवीण प्रजापती, लायन अनिल मोरे, तसेच उद्योजक समीर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत उत्सवाचा आनंद पोहोचविण्याचे लायन्स क्लबचे कार्य अधोरेखित झाले. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.