मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आंदुर्ले ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

 

*ग्रामविकासाचा चित्ररथाने वेधले साऱ्यांचे लक्ष* 

कुडाळ:-

आंदुर्ले ग्रामपंचायतच्या वतीने घटस्थापनेच्या शुभ दिवशी सायं ४.०० वाजता ग्रामविकासाची चित्ररथ यात्रा काढण्यात आली.या चित्ररथ यात्रेमध्ये मोठा मंगल कलश(घट) , नांगरधारी शेतकरी, संत गाडगेबाबा वेशभूषा,ढोलपथक यांचा सामावेश होता.तसेच या चित्ररथ यात्रेत महीला व पुरुष ग्रामस्थ तसेच युवक व शालेय मूले यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ही ग्रामविकास फेरी काढण्यात आली व यांच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये या अभियानाविषयी जनजागृती करण्यात आली. हे अभियानात अव्वल स्थानी रहाण्याचा संकल्प करण्यात आला. या प्रसंगी कुडाळ तालुका गटविकास अधिकारी श्री.प्रफुल्ल वालावलकर सर, कुडाळ पंचायत समीतीचे श्री.प्रभू सर, श्री.धरणे सर यांनी सदिच्छ भेट दिली यावेळी आंदुर्ले ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मा. सभापती श्री.संजय वेंगुर्लेकर, आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये, माजी ,माजी सरपंच सौ.आरती पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल भगत, सतिश राऊळ, प्रसाद सर्वेकर, स्मिता पिंगुळकर, सुप्रिया येरम,माजी सरपंच मनोहर राऊळ, पोलिस पाटील ज्ञानेश्वर तांडेल, आंदुर्ले गावातील सर्व शासकीय कर्मचारी, महीला, शालेय मूले,जेष्ठ नागरिक,युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदुर्ले ग्रामपंचायत पासून सूरु झालेली ही फेरी श्री.देवी आंदुर्लाई मंदिर पर्यंत नेण्यात आली. या अभियानाअंतर्गत गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे गावात चैतन्य निर्माण झाले आहे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत यांच्या वतीने केलेल्या आव्हानाला ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे एकूणच स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकाविण्यासाठी उत्स्फूर्तपणे ग्रामस्थ सहभागी होऊन विजयाचा निर्धार केला जात आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या प्रतिसादाबाबत माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.