रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील खानू मठ येथे कारमधून खाली पडलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान 7 एप्रिल रोजी मध्यरात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संकेत सुनिल संसारे (30,रा.नाणिज,तळवाडी बाजारपेठ,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे काका अनिल विठोबा संसारे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार,सोमवार 6 एप्रिल रोजी त्यांना संकेत संसारे हा खानू मठ या ठिकाणी कारमधून खाली पडलेला आहे असा फोन आला. म्हणून त्यांनी तातडीने त्याठिकाणी जाउन संकेतला प्रथम पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी संकेतला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी संकेतला तपासून मृत घोषित केले.













