वराडकर इंग्लिश मिडीयम व ज्युनिअर कॉलेज कट्टा जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत विजेते!

मसुरे | झुंजार पेडणेकर

जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवणच्या बोर्डिंग ग्राऊंडवर जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये वराडकर इंग्लिश मिडीयम व ज्युनिअर कॉलेज (विज्ञान) कट्टा प्रशालेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. संघात रिया शिरोडकर(कप्तान), लिबिया लोबो, दिक्षा ठोंबरे, श्रावणी पार्टे, संजना गावडे, पूर्वा नांदोसकर, यारसी पेडणेकर, रूची भोजणे, गौरी माळकर ,त्रिशा नाईक या विद्यार्थ्यांच्या संघाची निवड विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली. हे सर्व विद्यार्थी विभाग स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून श्री. दिपक जाधव तसेच सूर्यकांत परब, रोहन गावडे व वेदांत पोटफोडे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विजयी स्पर्धकांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त अँड. श्री. एस. एस. पवार, अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर, उपाध्यक्ष श्री. आनंद वराडकर, सचिव – श्री. सुनिल नाईक, सचिव – श्रीम. विजयश्री देसाई, खजिनदार – रवींद्रनाथ पावसकर, वराडकर हायस्कुल कट्टा स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर, वराडकर हाय. व कनिष्ठ महा. कट्टा चे मुख्याध्यापक श्री संजय नाईक, मालवण तालुका क्रीडा समन्वयक श्री. अजय शिंदे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ऋषिकेश नाईक, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.