सोमवार दिनांक 10 जुलै रोजी आमदार निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघ यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन भाजपा कार्यालय रत्नागिरी येथे सकाळी ठीक 10.30 वाजता होणार आहे.
अहवालाचे माध्यमातून आमदार डावखरे यांच्या विधिमंडळातील आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाचा लेखा जोखा मतदारांसाठी सादर होणार आहे. आमदार डावखरे , जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन, बाबा परुळेकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य भजपा आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहतील. अहवाल प्रकाशनाच्या या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे असे आग्रही निमंत्रण शहर अध्यक्ष सचिन करमरकर तालुका अध्यक्ष मुन्ना चवंडे भाजपा यांनी केले आहे.