संगमेश्वर तालुक्यात भातलावणीला प्रारंभ

माखजन |वार्ताहर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संगमेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांनी भातलावणीला प्रारंभ केला आहे.दरवर्षी ८ जुलै च्या दरम्यान तालुक्यातील भातलावणी पूर्ण झालेली असते.पाऊस उशिरा सुरु झाल्याने भात रोपाची वाढ झाली नव्हती.परिणामी तालुक्यातील भातलावणी लांबली आहे.
अनेक भागात अद्याप ही भातलावणी योग्य भातरोप तयार न झाल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षाचं करावी लागत आहे.बहुतांश ठिकाणी पेरणी झाल्यावर पाऊस नसल्याने पेरलेले भात पक्ष्यांनी खाल्ल्याने भात रोप पण विरळ आल्याचे चित्र आहे
भातलावणी जवळ जवळ १५ ते २० दिवस उशिराने सुरु झाल्याने शेतीची कामे रेंगाळली आहेत.सध्या ज्या ठिकाण च रोप वाढलं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भातलावणी ला प्रारंभ केला आहे.