Threads app: थ्रेडस्, इंस्टाग्रामची (Instagram) मूळ कंपनी, मेटा यांनी तयार केलेले, हे एक सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म आहे जिथे आयफोन किंवा अँड्रॉइड डिव्हाइस असलेले इन्स्टाग्राम युजर्स मजकूर पोस्ट शेअर करू शकतात आणि संवाद साधू शकतात. थ्रेड्समध्ये अकाऊंट कसे ओपन करावे याबाबत जाणून घेऊ.
- थ्रेड्स ॲप तुमच्या फोनवरील ॲप स्टोअर किंवा गुगल प्ले (Google Play) वर शोधण्यासाठी “Threads, an Instagram app” असे टाइप करा. थ्रेड्सवर अकाऊंट तयार करण्यासाठी तुमचे इनस्टाग्राम अकाऊंट असणे आवश्यक आहे.
- ॲप डाउनलोड केल्यानंतर, ते ओपन करा आणि तुमच्या स्क्रीनच्या तळाशी असलेले बटण दाबा व लॉग इन करा. थ्रेड्स युजर्सना Instagram वर फॉलो करत असलेल्या लोकांना फॉलो करण्याचा पर्याय दिला जातो. तसेच थ्रेड्सचे वैशिष्ट्य म्हणजे थ्रेड्सवर फॉलो करत नसलेल्या युजर्सचे थ्रेड्सही तुमच्या फीड मध्ये दिसते.
ॲप कसे नेव्हिगेट करावे
- एकदा तुमचे खाते सेट झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या थ्रेड फीडवर आणले जाईल जेथे तुम्ही फॉलो करत असलेल्या लोकांच्या पोस्ट पाहू शकता.
- तुमच्या स्क्रीनच्या तळाशी पहा आणि तुम्हाला आयकॉनची एक ओळ दिसेल जी तुम्हाला ॲप नेव्हिगेट करण्यास मदत करेल.
- हाऊस आयकॉन तुम्हाला तुमच्या फीडवर आणेल.
- भिंगाचे चिन्ह तुम्हाला एका शोध पृष्ठावर घेऊन जाते जेथे तुम्ही ज्या लोकांना फॉलो करू इच्छिता त्यांची नावे टाइप करू शकता.
- पेन-आणि-पेपर चिन्हावर क्लिक करून तुम्ही नवीन पोस्ट तयार करू शकता.
- हार्ट आयकॉन तुमच्या अकाऊंट कोणी फॉलो केले, तुमच्या थ्रेडला अर्थात पोस्टला कोणी प्रत्युत्तर दिले, त्यांच्या पोस्टमध्ये तुमचा उल्लेख कोणी केला आणि कोणते वापरकर्ते ॲक्टिव्ह आहेत हे ते दाखवते.
- मानवी आकृतीचे चिन्ह तुम्हाला तुमच्या थ्रेड प्रोफाइलवर घेऊन जाते जेथे तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी पाहू शकता.