सेवा पंधरवडानिमित्त रामेश्वर मंदिर येथे वृक्षारोपण कार्यक्रम

 

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : सेवा पंधरावडा निमित्त रामेश्वर मंदिर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी.बुथ क्र १ते ४ सेवा पंधरवडा कार्यक्रम तिर्लोट पं.स.संयोजक आरिफ बगदादी, महिला मोर्चा अध्यक्ष संजना आळवे, तालुका कार्यकारिणी सदस्य महेश बिडये, विनोदी सुके, प्रकाश पुजारे, बुथ अध्यक्ष योगेश टुकरूल, संदिप पुजारे, महेश चव्हाण, विजयदुर्ग प्रभारी सरपंच रियाज काझी, ग्रेसिस फर्नांडिस ,सत्यवान बाईत, यशवंत पुजारे,शांताराम बावकर, चंद्रकांत डांबरी, सूर्यकांत डांबरी, रवी धावरे, रुपेश घरकर, निलेश मणचेकर, संयोग घरकर, श्रीनिवास आदम, प्रशांत केळकर, आदित्य देवधर उपस्थित होते.

वृक्षारोपण या निमित्ताने या परिसरामध्ये आरिफ बगदादी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी ‘ मन की बात ‘ कार्यक्रमाद्वारे सर्व भाजप कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ तसेच मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती दर्शविली.