▪️एका गायीचा फडशा, वनविभागाने संवरक्षण दयावे ग्रामस्थांची मागणी
▪️वाघ सोडला की काय याबाबतही संभ्रम
*दोडामार्ग – सुहास देसाई
केर येथील ओमकार देसाई हे सायंकाळी घरी जात असताना भर रस्त्यावर त्यांना वाघ दृष्टीस पडला. सायंकाळीच एका गायीची शिकार वाघाने केली होती त्यामुळे भीती वाढली आहे. बिबट्या की पट्टेरी वाघ हे नेमक समजत नसलं तरी ग्रामस्थांत मात्र भीती आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी केर येथील मंगेश शांताराम देसाई यांची गाय वाघाने ठार केली होती. यातच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ओमकार देसाई हे चार चाकीने गावी येत असता त्यांना समोर वाघ दिसला. दुचाकीस्वार यांची रात्री उशिरापर्यंत ये जा असते त्यामुळे ग्रामस्थांत भीती आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी कल्पना दिली त्यांनी आपण वनविभागाचे कर्मचारी पाठवू अशी ग्वाही दिली मात्र तातडीने भयमुक्त गाव करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
केर येथील हा वाघ आणि वावर पाहता सदर वाघ मूळ अधिवासातील आहे की वनविभागाने सोडला याबाबत ग्रामस्थांत संभ्रम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कारण वाघ कमालीचा आक्रमक दिसत आहे त्यात मुख्य रस्त्यावर वाघ बसलेला पाहुन सध्या प्रचंड भीती ग्रामस्थांत आहे. वनविभागाने तातडीने गावात येऊन वातावरण भयमुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत












