चिपळुणात रत्नागिरी जिल्हा आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान कार्यशाळा उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण आणि रत्नागिरी उत्तर जिल्ह्याच्या वतीने शिक्षक पतपेढी हॉल चिपळूण येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला भाजपा महाराष्ट्र प्रदेश आत्मनिर्भर भारतसह संयोजिका तथा वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची गरज उद्भवते ती गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपल्याकडे ते उत्पादन सुरू होते ते स्वदेशी असे अनेक विषय स्नेहा दुबे पंडित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. हर घर स्वदेशी घर घर स्वदेशी अशा प्रकारे घोषणा देण्यात आल्या. यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, कोकण विभाग संवादक अभिजीत पेडणेकर आणि दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी केले.