सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते होणार सोहळा
मंडणगड प्रतिनिधी : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन येत्या रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. हा सोहळा माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री. भूषण रामकृष्ण गवई, सर्वोच्च न्यायालय, भारत यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर, उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वीकारले आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृह, उर्जा, विधी, सामान्य प्रशासन मंत्री माननीय श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे सन्माननीय मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच या प्रसंगी उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ संभाजी शिंदे, नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक उपक्रम मंत्री, माननीय श्री. उदय रविंद्र सामंत, उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच पालक मंत्री, रत्नागिरी जिल्हा, माननीय न्यायमूर्ती श्री. मकरंद सुभाष कर्णिक आणि माननीय न्यायमूर्ती श्री. माधव जयाजीराव जामदार, उच्च न्यायालय, मुंबई हेही उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. योगेश रामदास कदम हे सुद्धा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
हा समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड येथे आयोजित करण्यात आला असून, मंडणगड आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायालयीन यंत्रणेच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून विनोद यशवंतराव जाधव, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी; अॅड. मिलिंद अ. लोखंडे, अध्यक्ष, वकील संघ, मंडणगड; तसेच सौ. अमृता चा. जोशी, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-1, मंडणगड यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
हा सोहळा मंडणगड न्यायव्यवस्थेच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरणार असल्याची भावना कायदा क्षेत्रातील वर्तुळांत व्यक्त केली जात आहे.












