सोमेश्वर राडा प्रकरणी ५ जणांना अटक

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील सोमेश्वर येथे काही वर्षांपूर्वी राजकीय संघर्षातून झालेल्या खून प्रकरणावरुन रविवारी आणि सोमवारी झालेल्या वादातील अन्य पाच संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
अक्षय मयेकर,प्रथमेश बिडू,सुरज मयेकर,निलेश मयेकर,आशिष मयेकर अशी अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत.यापूर्वी याच प्रकरणातील
रुपेश मयेकर,विरेंद्र शिंदे आणि संदिप कदम या तिघांना अटक करण्यात आली होती.त्यांची जामिनावर सूटका करण्यात आली आहे.परंतू हे पाचजण राडा केल्यानंतर फरार होते.ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून त्यांच्याही मुसक्या आवळल्या.