रत्नागिरीः येथील स्पर्धा परीक्षा केंद्र कबीर अकॅडमीतर्फे लवकरच होणा-या तलाठी भरती परीक्षेसंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये तलाठीची जबाबदारी, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि परीक्षेची तयारी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सोबतच सरावासाठी एक प्रश्नपत्रिका मोफत दिली जाणार आहे, अशी माहिती अकॅडमीतर्फे दिली आहे.
तलाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १८५ जागांसाठी ही परीक्षा घेतली जाईल. अनेकदा इच्छा असुनही योग्य माहिती आणि मार्गदर्शन योग्य वेळी न मिळाल्याने इच्छुकांकडून अर्ज केला जात नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन कबीर अकॅडमीतर्फे या मोफत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले गेले आहे. याचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी ९९२१७००५५१ या क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस १६ जुलै आहे. तरी अधिकाधिक इच्छुंकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधून नाव-नोंदणी करून या मोफत मार्गदर्शन वर्गात सहभागी व्हावे, असे आवाहन कबीर अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.