वैभव खेडेकर अखेर भाजपात दाखल

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत गाजत घेतले हातात कमळ
खेड । प्रतिनिधी

बराच काळ रेंगाळलेला खेड येथील वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.

मनसे पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश होणार हे निश्चित झाले होते. मात्र दोनदा त्यांचा पक्षप्रवेश पुढे गेला होता. अखेर वैभव खेडेकर यांनी आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी भाजपा पक्षात मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा फायदा भाजपला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार असून वैभव खेडेकर यांच्या पुढील राजकीय रणनीतीकडे व भाजपकडून त्यांना कोणत्या पदाची संधी मिळते याकडे खेड वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.