वडिलांकडून त्यांनी कला केली आत्मसात
रत्नागिरी (प्रतिनिधी)
प्रत्येकाला तेजोमय लख्खप्रकाशात दिवाळी साजरी करायची असते खऱ्या अर्थाने दिवाळी सजावटीला सुरुवात होते ती आकाशकंदीलापासून अगदी गोरगरिबांच्या झोपडी पासून ते मोठ्या इमारतींवर सुद्धा आकाश कंदील लागतो. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी बाजारपेठेत दोन बहिणींनी बनवलेल्या आकाशकंदील आणि लक्ख झळाली घेतलेली दिसणार आहे.
रत्नागिरीमधील दोन भगिनी निकिता निलेश आंबेकर आणि श्रुती उमेश बने यांच्या हातून बनवलेल्या आकाश कंदीलाने रत्नागिरीकर दिवाळी साजरी करणार आहेत. दोन बहिणीच्या हातून तयार झालेले कंदील रत्नागिरीमधील नागरिकांच्या घराची शोभा वाढवणार असल्याचे दिसून येते. लहानपणी वडिलांकडून आकाश कंदील तयार करण्याची कला आत्मसात केल्यानंतर त्या कलेचा व्यवसायात रूपांतर करण्यात दोघी बहिणी यशस्वी झाल्या आहेत या दोन बहिणींची कला नव्या उद्योजकांना नक्कीच आदर्श आहेत. आकाशकंदीलाच्या किंमती सामान्य माणसाला परवडतील अशा आहेत तसेच छोटे कंदील सुध्दा डझन मध्ये उपलब्ध असणार आहेत.
यावेळी आकाश कंदील मध्ये कुंदन ,जाळीचे ,लाकडी, झुरमुळ्या ,वेलवेट ,बनवून थ्रीडी व सर्वाधिक मागणी असलेले पारंपारिक पद्धतीचे आकाश कंदील बाजारपेठेत विक्रीला असणार आहेत.
निकिता ,श्रुती यांचे वडील विजय पवार हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी करत असत नोकरी सांभाळून फावल्या वेळी वेगवेगळे कलात्मक व्यवसाय ते करत होते आकाश कंदील आणि अन्य प्रकारच्या वस्तू ते तयार करतात. निकिता व श्रुती यांच्या विवाह नंतर त्या घर संसार मुले यामध्ये गुंतल्यामध्ये या सर्व गोष्टी अंगीकृत असूनही दूर राहिल्या गेल्या पण शेवटी कला ती कलाच ती शेवटी कलाकाराला स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे त्यांनी आई-वडिलांना विचारून त्यांच्या मदतीने हा आकाश कंदील व्यवसाय पाच वर्षांपूर्वी सुरू केला यामध्ये त्यांचे आई वडील मूळ महत्त्वाचं म्हणजे दोघींचे पती देखील मिळेल त्या वेळेत त्यांना पूर्णपणे मदत करतं असल्याने आंबेकर आणि बने कुटुंब सुध्दा त्यांच्या मदतीला असते
सोशल मीडियाचा असाही वापर
निकिता व श्रुती यांनी तयार केलेले आकाश कंदील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप फेसबुक याद्वारे जाहिरात करून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो बरेचसे आकाश कंदील सोशल मीडियाच्या माध्यमातून बुकिंग केले जातात उर्वरित आकाश कंदील माळनाका येथील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर संध्याकाळच्या वेळी स्टॉल उभारण्यात येतों तिथे सर्व आकाशकंदील संपले जातात.
एक आकाशकंदील तयार करण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतो तसेच ग्राहकांना त्यांच्या आवडीचे सुध्दा आकाशकंदील तयार करून आम्ही देण्यासाठी प्रयत्नशील असतो. पाच वर्षांपासून आम्ही पारंपरिक पण त्यांना वेगळे स्टेक्चर देऊन आकाशकंदील बनवत आहोत आणि त्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. कलेची आवड मला शिक्षण घ्यायला लागले तेव्हा पासून होती. आताही आकाश कंदील व्यतिरिक्त मी महिलांना होणारा केसगळतीचा प्रकार यावर सुध्दा मी आयुर्वेदिक तेल आणि टोनर बनवून ते विक्री होते तसेच रांगोळी,वाचन यांचा छंद आहे त्यामुळे मी वेळ काढून सर्व करत असते
निकिता आंबेकर
दिवाळीच्या आधी साधारणपणे गणेशोत्सव संपल्यानंतर आम्ही आकाशकंदील तयार करण्यासाठी घेतो आमच्याकडे इकोफ्रेंडली आकाशकंदील तयार केले जातात तसेच लहान व मोठ्या आकाराचे सुध्दा आकाशकंदील तयार करून मिळतात. ग्राहकांना परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत
आलेला ग्राहक हा पैशाअभावी परत गेला नाही पाहिजे याची काळजी आम्ही दोघी बहिणी घेत असतो त्यामुळे या व्यवसायात आम्ही नफा व तोटा याचा विचार करतं नाही ग्राहकांमुल आपण आहोत हे आमच्या कायम डोक्यात असते.
श्रुती बने












