लांजा तालुक्याच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी

लांजा (प्रतिनिधी): देवरुख येथे नुकत्याच झालेल्या
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४ सुवर्ण व ३ कांस्य पदकांची कमाई केली.
संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगर पंचायत देवरुख ,तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्योरुगी व पुमसे स्पर्धा दि. १० ते १२ जुलै या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत
लांजा तालुक्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४ सुवर्ण व ३ कांस्य पदकांची कमाई केली.
सुवर्णपदक विजेते: स्वर्णीम श्रेयस शेट्ये, योगेश ईश्वर तोंडारे, भक्ती भागवत कुंभार व तेजस्वी दशरथ लाड.
कांस्यपदक विजेते: अमायरा मोहसीन अपराध, माऊली तुषार चव्हाण व वृत्ती रंजन पावसकर.
तसेच या स्पर्धेत युगा डोर्ले, अन्वी पवार, आदी रंजन पावसकर, दीपराज खानविलकर, तनया पाटकर, आर्या पवार, सात्विक साळुंखे, रीया लांजेकर, आराध्य सावंत व आदिश्री शेट्ये हे खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत लांजा अकॅडमीच्या सचिव तसेच राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून उत्कृष्ट काम पाहिले. तसेच सर्व खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, प्रमुख प्रशिक्षिका शितल आचरेकर व सहप्रशिक्षक गौरव खेडेकर,गणेश तोंडारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या खेळाडूंचे तायक्वांदो फिटनेस अकॅडमी लांजा व गुरुकुल अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, लक्ष्मण कर्रा, अकॅडमीचे मार्गदर्शक तेजस वडवळकर, तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे खजिनदार व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे आणि कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.