यशवंत सखाराम देवरूखकर पडेल देवरूखकरवाडी,यांच्या गोठ्या ला आज मध्यरात्री भिषन आग लागून गोठ्ठा जळून खाक झाला.हि बातमी स्वतः देवरूखकर यांनी उपसरपंच आयु.विश्वनाथ पडेलकर-पडेल यांना सांगितल्यावर उपसरपंच घटनास्थळी धाव घेत, प्राथमिक चौकशी केली, रात्रौ 11,30/12च्या दरम्यान हि घटना घडली.यात कुठलीही जीवितहाणी झाली नाही.पण गोट्याचे फारच मोठे नुकसान झाले. श्रीमान यशवंत सखाराम देवरूखकर, मुलगा,संदिप, सुन दीपलक्ष्मी देवरुखकर, नात पेर्वा असा परिवार घरात मध्यरात्री झोपेत असल्याने आग लागलागल्याचे समझले नाही,शेजारील रहाणारे पडेलकर कुटुंबांच्या लक्षात आले ,येवढ्या मध्यरात्री आगीच्या ज्वाळा , धुर कसला?म्हणून दरवाजा उघडून बाहेर आले तर . . ! हे दृश्य. आरडाओरड सुरू झाली, आग विझवण्याचा प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही. परीसरात गवत ओले होते म्हणून,अन्यतः संपूर्ण जवळच असलेल्या हापूस कलम बागा आगीच्या भक्ष्य स्थानी पडली असती,













