चिपळूण (प्रतिनिधी) : पारदर्शक कारभाराच्या बळावर सहकार क्षेत्रात गरुडझेप घेत ग्राहकांसाठी नवनव्या योजना राबवत त्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या भरणे येथील श्री संतसेना नाभिक पतसंस्थेला राज्यस्तरीय कार्यक्षेत्र प्राप्त झाले आहे, अशी माहिती पतसंस्थाध्यक्ष महादेव चव्हाण यांनी दिली. पतसंस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहू अशी हमी दिली.
संतसेना नाभिक पतसंस्थेने आर्थिक वर्षात ९.४९ कोटींनी ठेवींची वाढ करत ५३.९० कोटी रुपयांच्या ठेवी झाल्या आहेत. आर्थिक वर्षात ६५ लाख ९९ हजार रुपयांचा नफा मिळवत १२५ कोटीपर्यंत व्यवसायात वाढ करण्याचा निर्धारही पतसंस्थेने केला आहे. ग्राहकांसाठी नवनव्या कर्ज विषयक योजना राबवण्यात संस्था नेहमीच अग्रस्थानी असते. सामाजिक बांधिलकीतून गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी संस्था नेहमीच पुढाकार घेते. सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सहकार क्षेत्रातील अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. पतसंस्थाध्यक्ष महादेव चव्हाण यांना आदर्श चेअरमन, तर मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे यांनाही सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सहकार क्षेत्रात उतुंग झेप घेत प्रगतीचा आलेख उंचावणाऱ्या पतसंस्थेला राज्यस्तरीय कार्यक्षेत्र प्राप्त झाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांच्या विश्वासार्हतेमुळेच राज्यस्तरीय कार्यक्षेत्र प्राप्त झाला असून या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही पतसंस्थाध्यक्ष चव्हाण यांनी दिली.
राज्यस्तरीय कार्यक्षेत्र प्राप्त झाल्याने पतसंस्थाध्यक्ष महादेव चव्हाण यांच्यासह सर्व संचालक, पदाधिकारी, अधिकारी यांच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी व्हाईस चेअरमन विलास माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे, संचालक सिताराम राऊत, मिलिंद चव्हाण, श्यामसुंदर दळवी, संतोष शिंदे, संजय पवार, गौतम तांबे, संतोष जानकर, वनिता चव्हाण, नम्रता कदम, सहदेव पवार, अमित गरूड, सरव्यवस्थापक राजेंद्र मोरे यांच्यासह व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.











