सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केळस्कर यांची सामाजिक बांधिलकी
भावाच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप
गुहागर (प्रतिनिधी) : आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाप्रती बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत
केळस्कर यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.गावातील गरीब रुग्णांना आर्थिक मदतीचा हात देत वडिलांच्या स्मृती त्यांनी जागवल्या आहेत.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली येथे नुकतेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केळस्कर यांच्या वतीने रुग्णांसाठी फळवाटप व आर्थिक सहाय्य कार्यक्रम पार पडला. हा उपक्रम त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आणि भावाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता.प्रशांत केळस्कर यांनी आपले वडील कै. शंकर गोपाळ केळस्कर यांच्या स्मृतीनिमित्त गावातील गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक सहाय्य केले, तर त्यांचे भाऊ प्रवीण केळस्कर (सहाय्यक शिक्षक) यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे 25 रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले.
यावेळी यावेळी त्यांच्या कुटुंबातील अशोक केळस्कर, रवींद्र केळस्कर, प्रकाश केळस्कर, प्रविण केळस्कर, रुपेश महाडिक, रमेश तांबडे, श्रद्धा केळस्कर, पायल केळस्कर उपस्थित होते.वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल कांबळे, सरपंच मयुरी शिगवण, सदस्य सचिन कळंबाटे, माजी सरपंच यशोदा सांगळे, शरद जाधव, नितीन पवार, प्राध्यापक अमोल जड्याळ, पत्रकार प्रदीप चव्हाण, आशिष कारेकर, उत्तम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशांत केळस्कर हे मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य असून, ते अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय आहेत. गरजूंना मदत करणे, कुटुंबातील प्रसंगानुसार लोकोपयोगी उपक्रम राबवणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. प्रसिद्धीपासून दूर राहून ते गावातील रुग्ण व गरजू कुटुंबांना मदतीचा हात देत असतात.
यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले की,“गावातील ज्या रुग्णांना मुंबईतील केईएम, जे.जे. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन किंवा सर्जरीसाठी मदत हवी असेल, त्यांनी नक्की संपर्क साधावा. मी त्यासाठी प्रयत्नशील राहीन आणि भविष्यातही अशा रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत राहीन.











