चिपळुणात जागतिक हृदय दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन

चिपळूण (वार्ताहर) : लाईफकेअर हॉस्पिटल व ऑन्को लाईफकेअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लेन्मार्क फार्मास्युटिकल लिमीटेड यांच्या सहकार्यने MES कॉलेज यांच्या मार्फत जागतिक हृदय दिनानिमित्त चिपळूण येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून सुरु झाली ती नगरपालीका येथे जाऊन पथनाट्य सादर करुन तेथून मध्यवर्ती चिपळूण बसस्थानकाच्या प्रागणांमध्ये पथनाट्य व आरोग्य विषयक घोषणा देऊन चिपळूणकरांना आरोग्य उत्तम ठेवण्याचा संदेश लाईफ केअर हॉस्पीटलच्या मार्फत करण्यात आला.
त्यावेळी ग्लेन्मार्क फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीचे वैद्यकीय प्रतिनीधी विनायक भोकरे व अमोल शिर्के तसेच एम्.ई.एस् कॉलेजच्या शिक्षिका सौ. मधुरा रिसबूड तसेच लाईफकेअर हॉस्पिटलचे मार्केटिंग इनचार्ज हर्षद पाटील, ओंकार फुटाणे, सहारा वेलफेअर सोसायटी यांच्या मार्फत रुग्णवाहीकासहीत नवाझ काद्री आणि जे.एम्.बी.आर. यांच्या रुग्णवाहीकासहीत राहुल निगडे उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी लाईफ केअर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत सुर्वे यांनी नगरपालीका, एस्.टी डेपो व्यवस्थापक आणि ज्यांनी हा कार्यक्रम सुरक्षितपणे पार पाडला असे चिपळूण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे आभार मानले.