विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) : प्रतिवर्षाप्रमाणे गड किल्ले संवर्धन संस्था.महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने दिवाळी पाडवा या दिवशी किल्ले विजयदुर्गवर गडपूजन व दिपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात विजयदुर्ग बस डेपो येथून शिवरायांच्या पालखी मिरवणुकीने सुरवात करण्यात आली.
लखलखत्या मशालीच्या उजेडात भवानीमाता मंदीरापर्यंत ढोल ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. महादरवाज्याला तोरण बांधून २०० पणत्या तसेच ५१ मशाली प्रज्वलित करून रोषणाई करण्यात आली. या कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थ तसेच संस्थेचे युवक व युवती मिळून जवळपास २०० शिवभक्त उपस्थितीत होते.












