खेड (प्रतिनिधी) : सह्याद्री टेनिस असोसिएशन, खेड यांच्या वतीने दिवाळी निमित्त सामूहिक फराळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्वादिष्ट फराळाच्या सोबतच उदबोधक चर्चेने कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शैलेश सणस प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी “संतुलित आहार आणि शुद्ध आहार” या विषयावर मार्गदर्शन करताना आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. सणस यांनी आपल्या भाषणात नियमित चालण्याचे आरोग्यासाठी असलेले फायदे सांगत, “नियमित चालणे हे माझ्या फिटनेसचे रहस्य आहे,” असे सांगून उपस्थितांना प्रेरणा दिली.

या कार्यक्रमास सह्याद्री टेनिस असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य आणि उद्योजक श्री. मिलिंद इवलेकर, संस्थापक श्री. उत्तमकुमार जैन, अध्यक्ष श्री. प्रफुल्ल शेवरकर, सचिव श्री. शंकर पार्टे तसेच सह्याद्री परिवारातील प्रवीण तटकरी, वीरेंद्र चिखले, डॉ. विलास शेळके, अनिल मोरे आणि रहीम साहिबोले उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. फराळाच्या सुगंधाने आणि स्नेहभेटीच्या रंगतदार संवादाने सह्याद्री परिवाराचा हा दिवाळी सोहळा संस्मरणीय ठरला.











