दोडामार्ग – वे. ह. भ. प. पु. व सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रमाखाली चालत असलेल्या श्री पांडुरंग मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त तीन दिवसीय धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उत्सव शनिवार दि. १ नोव्हेंबर ते सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान भक्तिभावाने साजरा होणार आहे.
पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवार, दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता हरीपाठाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी भजन, सकाळी ७ वाजता हरीपाठ आणि रात्री ग्रामभजन होणार आहे.
तर सोमवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, त्यानंतर महापूजा व भजनें पार पडतील. सकाळी ११ वाजता दीडिं काढण्यात येईल व महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.
या तीन दिवसीय उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवंताच्या भक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पांडुरंग मंदिर समिती, झोळंबे (अध्यक्ष पांडुरंग मंदिर, झोळंबे) यांनी केले आहे.











