महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग
नवी मुंबई : नवी मुंबई येथील डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत भारतीय महिला संघाने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेले तब्बल ३३९ धावांचे आव्हानात्मक लक्ष केवळ ४८.३ षटकांत पार करीत भारतीय संघ विजेता ठरला. शतकवीर जमिमा रॉड्रिग्ज हिच्या नाबाद १२७ धावांच्या केळीने हा अशक्यप्राय विजय शक्य झाला. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करीत महिला संघाने हा इतिहास रचला. आता भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका संघसोबत अंतिम सामना होणार असून भारतीय संघ वर्ल्डकप विजयापासून एक सामना दूर आहे. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.












