दोडामार्ग: सुहास देसाई
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये नशा मुक्ततेबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी पंचायत समिती दोडामार्ग आणि तालुका प्रशासनाच्या वतीने भव्य जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून तरुण पिढीला सकारात्मक जीवनशैलीकडे वळवण्याचा आणि ग्रामपंचायतींना समृद्धतेच्या दिशेने प्रेरित करण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश साधला जाणार आहे.हा कार्यक्रम दिनांक: ०७ नोव्हेंबर २०२५ सकाळी ०७.३० वाजता दोडामार्ग जिल्हा परिषद शाळा नं-१ चे क्रिडांगण येथे होणार आहे
उत्स्फूर्त सहभाग सर्वांनी घ्यावा
या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमामध्ये तालुक्यातील मा. सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ऑपरेटर, महसूल प्रशासन प्रतिनिधी, पोलिस पाटील, शाळा-महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, CRP, आशासेविका, अंगणवाडी सेविका, NSS व NCC विदयार्थी, युवक मंडळे, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सैनिक हे उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
या पदयात्रेचा मुख्य उद्देश
ग्रामस्तरावर नशा विरोधी जनजागृती करणे. तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार
तरुण पिढीला सकारात्मक जीवनशैलीकडे वळवणे.
ग्रामपंचायतींना समृद्धतेच्या दिशेने प्रेरित करणे. आदी
उद्देश यात आहेत या पदयात्रेनंतर जनजागृतीपर संदेश, नशाबंदी शपथ आणि संवाद सत्राचे आयोजन झरे-२ शरद क्षेत्र फंक्शन हॉल येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी आणि स्थानिक नेतृत्व उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे यामध्ये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, दोडामार्ग यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना या नशा मुक्त जनजागृती पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.









