राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी प्रकाश मांडवकर तर उपाध्यक्षपदी प्रकाश लोळगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांनी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयामध्ये भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दळेचे सरपंच महेश करंगुटकर, ओमकार प्रभुदेसाई, भरत लाड, संचालक अनंत मोरवसकर, रमेश सुद, अविनाश नवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, वसुली अधिकारी श्रीकांत राघव तसेच कर्मचारी उपस्थित होते.