Stray Dogs Issue: सुप्रीम कोर्टाचा श्वानप्रेमींना दणका! रस्त्यावरून सर्व श्वान उचला; शाळा, मैदान परिसरात भटके कुत्रे दिसता कामा नये

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. सर्व राज्यातील भटक्या कुत्र्‍यांना हतवण्याचे आदेश दिले आहेत. शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानक या सर्व परिसरातून भटक्या श्वानांना हटवन्याचे आदेश जारी केले आहेत. त्याच बरोबर रस्त्यावरील गायी – म्हशींच्या वावरावरही बंदी केली आहे. पुढील आठ आठवड्यांत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश असून, रस्त्यावरील गायी-म्हशींच्या वावरावरही बंदी घालण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याला पुढील तीन महिन्यांत रस्त्यावरील सर्व कुत्रे हटवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.